माझी कविता कुठल्याच आनंदसागरात भिजलेली नाही
वा दु:खाच्या दरीतही कोसळलेली नाही
माझी कविता हा मी स्वत:चा घेतलेला शोध आहे
स्वत:च निर्माण केलेल्या प्रश्नांना
स्वत:च दिलेलं उत्तर आहे
माझे शब्द आहेत माझे स्वर
शब्दसतारीवर मी हात रक्तबंबाळ होईपर्यंत छेडलेले
ते आहेत असंख्य राग
मी नकळत आळवलेले
माझी कविता हि माझी अस्वस्थ्ता आहे
स्वस्थ होण्यासाठी केलेला
तो एक केविलवाणा प्रयत्न आहे
तुमच्यासाठी ते फ़क्त शब्द असतील
माझ्यासाठी माझी कविता
मी जगण्यासाठी घेतलेला
मोकळा श्वास आहे.......
कौस्तुभ……
Tuesday, November 13, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment