झाली सांज एकाकी, कोणी वाजवेना पावा
सूर हरवलेल्या मनात आज कृष्ण दाटून का यावा?
का रंग मावळतीचे आता काळोखी बुडाले
का पंख परतीचे आज नाही ऊडाले
तुटलेल्या संध्येची तार कुणी आज जोडलीच नाही
हरपलेल्या स्वरांची सतार आज कुणी छेडलीच नाही
का गप्प झाली सांज आता शब्दही फ़ुटेना
तुझ्या आठवणीत आज सांज हरवून गेली...........
Friday, December 7, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment