Tuesday, April 1, 2008

अवेळीच्या पावसा

मी म्हटलं पावसाला
"अरे अवेळीच्या पावसा
असा कोसळू नको पुन्हा पुन्हा"
पाऊस म्हणाला
"वरुन(ण) ऑर्डर आली
यात माझा काय गुन्हा?"

संतानाही आता कॉम्प्यूटरचा संग...

संतानाही आता । कॉम्प्यूटरचा संग
लॅपटॉप हॅंग । तुकोबाचा ॥

अभंग ऑनलायन । वाचते विठामाय
केला रिप्लाय । विठ्ठलाने ॥

अभंग रेकॉर्डेड । ऐकता गोड ।
मदरबोर्ड । पावन झाला ॥

सोडली लेखणी । धरता किबोर्डाचा संग ।
टायपिले अभंग । सेकंदात ॥

अवघी नगरी । कॉम्प्यूटरमय झाली ।
सिलिकॉन व्हॅली । पंढरीची ॥

तुका म्हणे आता । पुरे पंढरीची वारी
पाहिलेली बरी । इंटरनेटावरी ॥