Posts

Showing posts from September, 2016

कश्मीर २

दिमाखात फडकत राहील
एक तिरंगी षडयंत्र
आपण मुठी आवळत
आकाशाकडे बघत
छाती 56 इंच फुगविण्यासाठी
जेव्हा मोठ्ठा श्वास घेऊ
उत्तरेकडच्या नंदनवनातून
मुडदयांची दुर्गंधी येईल
आपण गुदमरायचं नाही
राष्ट्रवादाचे सुस्कारे सोडायचे फक्त....