Monday, December 31, 2007

वर्ष सरलं तरी!




वर्ष सरलं तरी,
जखमा भरल्या नाहीत
नव्या जखमांना शरिरावर
जागाही उरली नाही
अश्रू आटून गेले
आता भावनाही संपल्या
तरीही का ह्या वेदना
मनात आहे गुंफ़ल्या?
व्यवहारी झालोय मी आता
व्यवहारी जीवन जगतोय
मनातल्या आठवणींचा कप्पा
क्वचितच उघडून बघतोय
का ह बदल माझ्यात?
क बदललंय सगळच वातावरण
धुमसत का राहतं अजूनही
पेटलेल्या मनाचं सरण
नवी पहाट दूर करेल हा काळोख?
का वाढत जाईल हा काळोख?
नाही!
प्रकाशाच्या शक्तिने काळोखी भींतीला
पडेल एक खिंडार...
कोंडलेल्या श्वासाला मिळावे
आता सुस्कारे आकाशाचे
मनाला लाभावे नवचैतन्य
सळसळण~या रक्ताचे
सतारीवर छेडावे आता
स्वर नव्या भूपाळीचे
चिकारीही झंकारत याव्या
घेऊन स्वरगालिचे
विदीर्ण झालेल्या मनाला
फ़ुटावी पालवी नवी
सरत्या वर्षाने गावी
ह्या आसवांची भैरवी

Monday, December 3, 2007

काही चारोळ्या.....

माझं विष आता
मलाच डसू लागलंय
गारुड्याच्या पुंगीलाही
आता जग फ़सू लागलंय

अडखळणारा श्वास हा
आहे स्वतःशीच थांबलेला
अश्रूंनी भिजूनसुध्दा
आत कुठेतरी पेटलेला

तुझ्या आठवणींचे निखारे
धुमसत आहे अजूनही
पूर्णपणे विझलेले नाहीत
शुष्क आसवांत भिजूनही

Tuesday, November 13, 2007

तुझी पुसटशी आठवण
अश्रुंचा बांध तोडून जाते
खोलवर दडपून ठेवलेल्या भावना
रक्तात पेट घ्यायला लागतात
रेशमी धाग्यांनी शिवलेली जखम
पुन्हा एकदा उसवली जाते
आणि वाहत्या रक्तावर कोणाचाच ताबा उरत नाही
सहन होत नसलेल्या वेदनांचे वादळ झेलत
सभोवताली माजलेल्या कोलाहलात
एका गडप अंधारी विश्वात
तुझ्या आर्त स्वरांचा ठाव घेत
मी तारा तुटलेली सतार छेडत असतो

कौस्तुभ……

Saturday, November 3, 2007

भावनाशुन्य जीवन जगावं लागेल
हे आधीच कळलं होतं
पुढची संकटं ओळखून
आधीच पाऊल वळलं होतं
म्हणून असेल कदाचित
तुझ्या जाण्याने दु:ख झालं नाही
कारण तुझं जाणं तुझ्याआधीच मला कळलं होतं........

kaustubh....
खूप काही सांगायचं होतं
मनात साठवून ठेवलयं
शांत राहण्याच्या प्रयत्नात
रक्त गोठवून ठेवलंय
कधीतरी लागेल वणवा
वितळून सगळं जाईल
मनात साठवलेलं सगळं
डोळ्यातून वाहत जाईल

kaustubh......
मृगजळामागे धावताना
कधी कधी भान राहत नाही
जिवाच्या तहानेमुळे
आपण मागेपुढे पाहत नाही
पाणी तिथं नव्हतंच
हे तिथं पोहोचल्यावर कळतं
आणखी एका मृगजळाच्या शोधात
आपलं पाऊल वळतं

kaustubh.....