श्वास होते चालू, जगणे हरवले होते
देशाचे ह्या भाग्य, कोणी फ़िरवले होते?
कोण कुठले प्रेषित, एकजात भोंदू सारे
अजाणता आम्ही कोणाला, देव ठरवले होते
उभा देश झाला जखमी, रक्त धर्माचे वाहले
कुठल्या स्वातंत्र्याचे झेंडे, तेव्हा मिरवले होते?
सुताने गाठता येतो स्वर्ग सिध्द होते झाले
जेव्हा त्या महात्म्याने एक चाक फ़िरवले होते
स्वप्ने सोनेरी होती तेव्हा डोळ्यात आस होती
काय झाले आमचे आज, काय ठरवले होते?
4 comments:
सुताने गाठता येतो स्वर्ग सिध्द होते झाले
जेव्हा त्या महात्म्याने एक चाक फ़िरवले होते
अप्रतिम
उभा देश झाला जखमी, रक्त धर्माचे वाहले
कुठल्या स्वातंत्र्याचे झेंडे, तेव्हा मिरवले होते? वाह......
सगळ्यांच्याच भावना बोलतायत...ह्या तुझ्या कवितेतून.
खूप प्रभावशाली झाली आहे कविता.
काय रे काय मस्त कविता आहे... मला निवडायला वाव च नाही ठेवला! प्रत्येक कडव एक नंबर ... मला फारच आवडली हि कविता ...
Post a Comment