आता पुन्हा भेटू तेव्हा
बोलू फ़ोनवर राहून गेलेलं
उभयतांच्या विरहात
डोळ्यातून वाहून गेलेलं
आता पुन्हा भेटू तेव्हा
उसास्यांचे हिशेब मांडू
कोणी ढाळले अश्रू जास्त
ह्याच मुद्दयावर भांडू
आता पुन्हा भेटू तेव्हा
एकमेकांना डोळे भरून पाहू
काही क्षणापुरतेच का होईना
घटट बिलगून राहू
आता पुन्हा भेटू तेव्हा
तू धरशील परत न जाण्याचा हटट
आणि भाबडे हात तुझे
मिठीही करतील अधिक घटट
आता पुन्हा भेटू तेव्हा
मागे काहीतरी ठेवून जा
पुढची भेट होईपर्यंत सख्या
रोज स्वप्नात येऊन जा......
8 comments:
Sundar.
सुंदर !
khup chan :)
अप्रतिम.. फारच सुंदर !!
वाह वाह... सुंदर !!
अप्रतिम .... आजची कविता.
आवडली!
Whaaaa
Post a Comment