माझ्या "ब्राम्हण" मैत्रिणीस
तू स्त्री असूनदेखील शोषितांचं दु:ख समजू शकत नाहीस
ह्याचं आश्चर्य वाटतं सारखं
तुला स्वैपाकघरात कोंडून ठेवलेलं
मला जातीव्यवस्थेच्या तळाशी
परंपरेने ज्ञानर्जनाचे मार्ग ना तुला खुले होते ना मला
जानवं घालायचा अधिकार ना तुला न मला
मान वर करुन, डोळ्यास डोळा भिडवून बोलण्याचा अधिकार
ना तुला न मला
आपली पायरी ओळखून वागण्याचा जन्मजात मिळालेला शाप
तुझ्यामाझ्या शरिराचे विटाळही ठरलेलेच
इतकं सगळं असूनसुध्दा
"ब्राम्हणांनी तुमचं काय घोडं मारलंय रे?"
हे विचारताना तुझ्या लक्षात हे कसं येत नाही
कि घोडे पाळायचा आणि उधळायचा अधिकार
ह्या व्यवस्थेने तुला काय मला, सारखाच नाकारलाय
तू स्त्री असूनदेखील शोषितांचं दु:ख समजू शकत नाहीस
ह्याचं आश्चर्य वाटतं सारखं
-कौस्तुभ

5 comments:
Wow! I still experience these dialogues and feel pity!
Good one...
कविता छान आहे. पण आपणअनेक ब्राम्ह्नांनीच जाती व्यवस्था उलथून टाकण्यासाठी प्रयत्न केले असताना आणि जातीव्यवस्था कात टाकत असताना आपण आणखी क्तीती दिवस असेच लिहित रहाणार. उलट आज आरक्षणाचे फायदे लाटण्यासाठी ब्राम्ह्नांपेक्षा इतर समाज खऱ्या अर्थाने जाती व्यवस्था धरून ठेवतोय. सवर्ण समाजावर आसूड ओढून अनेक दलित लेखकांनी नावलौकिक मिळवला. पण आता पुरे ना.
तुझा मुद्दा बरोबर आहे पण या लॊजिकने ती मुळात ब्राह्मण उरतच नाही.
जात, धर्म, वंश हे फक्त बापाच्या बाजूनेच बघण्याची आपली जुनी परंपरा बिरंपरा. दर पिढीमधे येऊन मिसळलेल्या मातांच्या धाग्यांची कुठे नोंद नाही की कुठे मान्यता नाही.
बाईने हे उलथायचं ठरवलं तर फार गैरसोयीचं होईल सगळ्यांच्या.
असो तुझ्या या ब्राह्मण मैत्रिणीला विस्मरण झाले असावे पूर्वीचे कारण हल्ली ब्राह्मण घरात ती तेवढी शोषित राह्यली नाही. अजिबात शोषण होत नाही असे नाही पण परिस्थिती बरीच वेगळी आहे. ही आपली एक शक्यता.
पण मुद्दा पोचला.
- नीरजा
Post a Comment