Tuesday, March 22, 2011

वायफ़ळ बडबड

सुर्याला असा घाम वगैरे येतो का?
अन चंद्राला जागरणाचा त्रास वगैरे होतो का?
झाडाला सावली कोण देतं?
पंखांना उंचीची भीती वगैरे वाटत नाही का?
कोतवाल पक्ष्याची नक्कल कोण करतं?
झाडांच्या मुळांना अंग झटकावंसं वाटत नाही?
पाण्याल तहान लागते का?
मासे कशाला रडत नाही?
पृथ्वी भोवळ येऊन पडत कशाला नाही?

आणि असे असंख्य प्रश्न
जे गाडले होते ’वायफ़ळ बडबड’ म्हणून
माझ्या घरामागच्या शाळेवर बुलडोझर फ़िरविला
तेव्हा अचानक बाहेर आले!

16 comments:

Anagha said...

सुंदर!

BinaryBandya™ said...

सुंदर!!!!!

इंद्रधनु said...

अप्रतिम.....

Unknown said...

Kaustubh, chaan! Khup chaan!
Mala mahiti nhavta aapan marathi kavita lihta, te sod, mahiti nhavta tu marathi boltos
Khup khup sundar, masta vaatla! :)


~dark_gal~
( kaali mulgi? :P )

हेरंब said...

अप्रतिम... शेवट तर खुपच सुंदर !!

Unknown said...

:(

Suhas Diwakar Zele said...

मस्तच रे..

सौरभ said...

great!!!

mau said...

अप्रतिम !!

Shriraj said...

कौस्तुभ, तू हे जे लिहिलयस ते इतकं अप्रतिम आहे... की यातली प्रत्येक ओळ सदैव आमच्या स्मरणात राहील...

Anand Kale said...

अप्रतिम... शेवट तर खुपच सुंदर !!

Deepak Parulekar said...

अप्रतिम!! मस्तच !! शेवट अगदी हेलावणारा !!!

सारिका said...

सुंदर..अप्रतिम...शेवट तर खुपच सुंदर !!

THEPROPHET said...

सुरेख!

Kaustubh said...

@सगळ्य़ांना
मनापासून धन्यवाद!

Sagar Kokne said...

क्या बात कौस्तुभ!
अशा प्रकारच्या कविता मला नेहमीच आवडतात