Saturday, November 11, 2023

मतीविलय

 संपू दे हा शोक, देह बधीर होऊ दे
लयास जावो पृथ्वी, मतीविलय  होऊ दे

रातीस विझून गेली हि चंद्राची कोर
सूर्यालाही  विझव आता तारे तू चोर
सत्तेच्या नाकावर नाचे चिथावलेला मोर
तोच सर्वश्रेष्ठ साला तोच हरामखोर
ह्या भाडोत्री मुजऱ्याची सवय होउदे

तोफांच्या तालावर इथे डुलते लोकशाही
गर्भारले देश जरी बाप घरी नाही
किणल्या रक्तास होई सुकण्याची घाई
भुकेलेले बाळ शोधी मेलेली आई
इडापिडा परत येवो प्रलय होउदे

No comments: