हांवे विचाल्ले कार्ल मार्क्साक
मार्क्सबाब, नाल्ल रे कोणाचो?
माड पाडपी रेंदेराचो?
काय भाडकाराचो?
मार्क्स म्हणे, कोकोनट इज द न्यू ग्रास
नाल्ल तेजोच जो काडटा त्रास
मार्क्साक खबरना हांगसल्ले
काष्टी आणि पुडव्याचे डायलेक्टीक
थोडे पुडवे सोडून दिगंबर
काष्टेक रुचिक लागता बौध्दिक
चेड्डी घालून बॅण वाजोन
दसऱ्याक काडटा पुरसांव
खुर्साआड रावून दिता
रामराज्याचे शेरमांव
Saturday, November 11, 2023
काष्टी आणि पुडव्याचे डायलेक्टीक
Thursday, October 31, 2019
माझ्या विझण्याचा सोहळा
इथल्या चांदण्यांनाही होता
माझ्या हसण्याचा लळा
रात्र होण्याआधी संपवा
माझ्या विझण्याचा सोहळा
पाठ फिरवून जगाकडे मी
घ्यायला निघालो समाधी
कित्येक सरसावले पुढे
मागून कापण्या गळा
सावलीत पहुडल्या आश्रिताला
काय सांगू माझी व्यथा
मातीत रुजण्याचे शाप
अन सूर्य सोसण्याच्या झळा
माझ्या बदनामीचे का आहे
येथे वावडे कुणाला?
कोणी करावीच बातमी तर
काय लिहावा मथळा?
जगण्याच्या इच्छेविरुद्ध मी
भरतो जीवघेणे उसासे
मी निमंत्रले आहे मरण
श्वास करण्या मोकळा
- कौस्तुभ
माझ्या हसण्याचा लळा
रात्र होण्याआधी संपवा
माझ्या विझण्याचा सोहळा
पाठ फिरवून जगाकडे मी
घ्यायला निघालो समाधी
कित्येक सरसावले पुढे
मागून कापण्या गळा
सावलीत पहुडल्या आश्रिताला
काय सांगू माझी व्यथा
मातीत रुजण्याचे शाप
अन सूर्य सोसण्याच्या झळा
माझ्या बदनामीचे का आहे
येथे वावडे कुणाला?
कोणी करावीच बातमी तर
काय लिहावा मथळा?
जगण्याच्या इच्छेविरुद्ध मी
भरतो जीवघेणे उसासे
मी निमंत्रले आहे मरण
श्वास करण्या मोकळा
- कौस्तुभ
Friday, February 22, 2019
कोपरा
निबिडाचा पत्ता विचारीत
तुझ्या घराची कोणी दाखवावी दिशा
तेव्हा तू व्यापून बसावंस आभाळ
आणि माझ्यासाठी नसावा तिथे एकही कोपरा
ह्या दरवेळच्या निरर्थकतेला झाटावर मारुन
आपण चालत जावं विरुद्ध दिशांनी
आणि गॅलिलिओने द्यावे संदर्भ
पृथ्वीला गोल(च) असण्याच्या शापाचे
तुझ्या घराची कोणी दाखवावी दिशा
तेव्हा तू व्यापून बसावंस आभाळ
आणि माझ्यासाठी नसावा तिथे एकही कोपरा
ह्या दरवेळच्या निरर्थकतेला झाटावर मारुन
आपण चालत जावं विरुद्ध दिशांनी
आणि गॅलिलिओने द्यावे संदर्भ
पृथ्वीला गोल(च) असण्याच्या शापाचे
Wednesday, August 23, 2017
खिडकी-1
खिडकीत रुतल्या गजांशी
हि सलगी संपत नाही
ना सांज विरत जाते
ना वारा कंपत नाही
तुळशीची रोपे आता
भासतात जीवघेणी
तू खुडून न्यावीस पाने
डोळ्यांत दाटवून पाणी
हे आभाळाचे ओझे
कोणाशी रिते करावे?
वक्षांत अडकल्या तुझिया
कुठल्या रात्रीला स्मरावे?
हि सलगी संपत नाही
ना सांज विरत जाते
ना वारा कंपत नाही
तुळशीची रोपे आता
भासतात जीवघेणी
तू खुडून न्यावीस पाने
डोळ्यांत दाटवून पाणी
हे आभाळाचे ओझे
कोणाशी रिते करावे?
वक्षांत अडकल्या तुझिया
कुठल्या रात्रीला स्मरावे?
Tuesday, May 2, 2017
रह गये
हम रदीफ़ बदलते रह गये
वो मिसरे बदलते रह गये
क्या पूछे मरीजों का हाल जब
वो हकीम बदलते रह गए
हमने भेजना चाहा खत उन्हें
वो पता बदलते रह गये
हम बैठे ज़माने के पाबंद
वो ज़माना बदलते रह गये
अभी तो जानने लगे थे उन्हें
वो पहचान बदलते रह गये
हम रोजे तोड़ ना सके
वो चाँद बदलते रह गये
वो मिसरे बदलते रह गये
क्या पूछे मरीजों का हाल जब
वो हकीम बदलते रह गए
हमने भेजना चाहा खत उन्हें
वो पता बदलते रह गये
हम बैठे ज़माने के पाबंद
वो ज़माना बदलते रह गये
अभी तो जानने लगे थे उन्हें
वो पहचान बदलते रह गये
हम रोजे तोड़ ना सके
वो चाँद बदलते रह गये
Saturday, April 29, 2017
बौद्धिक षंढत्व
मी देऊ शकत नाही नवा विचार
ना शक्यता निर्माण करू शकतो क्रांतीची
मी लिहू शकतो फक्त आत्ममग्न स्वगतं
मला जमते फक्त माझे रडगाणे आभाळाएवढे करणे
मी गाठू शकतो केवळ निरर्थकतेचेच तळ
आशावादाचे कर्ज डोक्यावर घेऊन फिरणे
आता परवडत नाही
मी नाही लिहू शकत नवी कविता
कारण जमत नाही आता झटकून देणे
कुजलेल्या सौंदर्यशात्राचे ओझे
मी जाणीव करु शकत नाही समृद्ध
फक्त प्रसवू शकतो भूल
स्थळकाळाचे भान ठेवून
मी आता पत्करलेय बौद्धिक षंढत्व
आणि करत सुटलोय जयजयकार
कशाचही....
ना शक्यता निर्माण करू शकतो क्रांतीची
मी लिहू शकतो फक्त आत्ममग्न स्वगतं
मला जमते फक्त माझे रडगाणे आभाळाएवढे करणे
मी गाठू शकतो केवळ निरर्थकतेचेच तळ
आशावादाचे कर्ज डोक्यावर घेऊन फिरणे
आता परवडत नाही
मी नाही लिहू शकत नवी कविता
कारण जमत नाही आता झटकून देणे
कुजलेल्या सौंदर्यशात्राचे ओझे
मी जाणीव करु शकत नाही समृद्ध
फक्त प्रसवू शकतो भूल
स्थळकाळाचे भान ठेवून
मी आता पत्करलेय बौद्धिक षंढत्व
आणि करत सुटलोय जयजयकार
कशाचही....
कटप्पाने बाहुबलीला का मारलं?
कैक दिवसांनी मला
एकाच प्रश्नाने घेरलं
कटप्पाने बाहुबलीला
का म्हणून मारलं?
हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे
देशाचं सार्वभौमत्व धोक्यात आहे
प्रश्नाची उकल झालीच पाहिजे
कटप्पाने असं का केलं
हे कळलंच पाहिजे
इतर प्रश्न तर रोज़च असतात
पण हे प्रकरण आहे खास
कटप्पाची इंटेन्ट कळेपर्यंत
सोडायचा नाही ध्यास
एरव्ही कोणी मारले कुणाला
आपल्याला काय घेणं
पण बाहुबलीच्या बापाचं
लागतो आपण देणं
म्हणून काळजी रास्त आहे
पर्सनल स्टेक जास्त आहे
देशभरात लोक सगळे
एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत
काय झालं असेल त्यांच्यात
असं कसं घडलं?
कळलं का हो तुम्हाला,
कटप्पाने बाहुबलीला का मारलं?
थ्रीडी व्हीआर व्हीएफएक्स
हेच खरं आहे
बाहेरच्या बोरिंग रियॅलिटीपेक्षा
तेच बरं आहे
शेतकऱ्यांनी आत्महत्या करुदेत
अखलाक, पेहलू खान मरताहेत, मरुदेत
त्यांचे खून पाडले म्हणून
आपण रडायचं नाही
बाहुबलीच्या खुनाचं कुतूहल
आपण सोडायचं नाही
कुठल्या कटप्पाने आपल्यातल्या
संवेदनशीलतेला मारलं
आपल्यातला माणुसकीला आपण
कुठे नेऊन पुरलं?
ते जाऊद्यात
मला सांगा
कटप्पाने बाहुबलीला का मारलं?
एकाच प्रश्नाने घेरलं
कटप्पाने बाहुबलीला
का म्हणून मारलं?
हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे
देशाचं सार्वभौमत्व धोक्यात आहे
प्रश्नाची उकल झालीच पाहिजे
कटप्पाने असं का केलं
हे कळलंच पाहिजे
इतर प्रश्न तर रोज़च असतात
पण हे प्रकरण आहे खास
कटप्पाची इंटेन्ट कळेपर्यंत
सोडायचा नाही ध्यास
एरव्ही कोणी मारले कुणाला
आपल्याला काय घेणं
पण बाहुबलीच्या बापाचं
लागतो आपण देणं
म्हणून काळजी रास्त आहे
पर्सनल स्टेक जास्त आहे
देशभरात लोक सगळे
एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत
काय झालं असेल त्यांच्यात
असं कसं घडलं?
कळलं का हो तुम्हाला,
कटप्पाने बाहुबलीला का मारलं?
थ्रीडी व्हीआर व्हीएफएक्स
हेच खरं आहे
बाहेरच्या बोरिंग रियॅलिटीपेक्षा
तेच बरं आहे
शेतकऱ्यांनी आत्महत्या करुदेत
अखलाक, पेहलू खान मरताहेत, मरुदेत
त्यांचे खून पाडले म्हणून
आपण रडायचं नाही
बाहुबलीच्या खुनाचं कुतूहल
आपण सोडायचं नाही
कुठल्या कटप्पाने आपल्यातल्या
संवेदनशीलतेला मारलं
आपल्यातला माणुसकीला आपण
कुठे नेऊन पुरलं?
ते जाऊद्यात
मला सांगा
कटप्पाने बाहुबलीला का मारलं?
Subscribe to:
Posts (Atom)