Monday, August 29, 2011

कसं होईल रे आपलं


"कसं होईल रे आपलं"
तिचा नेहमीचा प्रश्न
माझी क्षितिजावरची नजर
होत जाते तीक्ष्ण

"होईल गं सारं ठिक"
माझा काहीसा खोटा आविर्भाव
तिला पटत नाही
ती वाचते नजरेतला भाव

लाटा आदळत राहतात
किनारा सरकत राहतो
तिच्या माझ्या अबोल्यात
वेळ रिकामा जात राहतो

माझं डोकं तिच्या खांद्यावर
नकळत स्थिरावलेलं
"कसं होईल रे आपलं"चं कोडं
तेव्हाच तिनं सोडवलेलं